एका कॉम्प्युटर वर सुरु केलेली कंपनी ते आज भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्लाऊड होस्टिंग सेवा देणारी कंपनी. अनेक देशात देतेय आपली सेवा व करतेय ५०० कोटींच्यावर उलाढाल.
व्यवसाय निर्मिती आणि वाढीसाठी व दीर्घकालीन संबंधांचे योग्य पालनपोषण करण्याची क्षमता म्हणूनच आज आयटी उद्योगात सर्वत्र नावलौकिक असणारे नाशिकचे तरुण उद्योजक.
छोट्याशा गावातून मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले पियुष सोमानी. वडील बँकेचे अधिकारी आणि आई गृहिणी. पियुष हे शाळेत अतिशय हुशार होते.
२००२ मध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले व मुंबई येथे नोकरीस रुजू झाले नंतर नोकरीत काही तथ्य वाटेना म्हणून नाशिक मध्ये ६ मित्रांना बरोबर घेऊन वेब होस्टिंग सपोर्ट व्यवसाय २००४ मध्ये सुरू केला. यात प्रत्येकाची पहिली गुंतवणूक होती ती म्हणजे फक्त एक कॉम्प्युटर.
पियुष यांनी २००५ मध्ये ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा. लि. कंपनी स्थापन केली व यातील अनेक संकटे, कठोर परिश्रम, सतत नवनवीन तंत्रज्ञान शिकणे व योग्य तो बदल करणे यामुळेच ESDS चे आज UK, US, Dubai, Delhi, Bangalore, Mumbai आणि Pune येथे ब्रँच ऑफिसेस आहेत.
पियुष यांना महाराष्ट्र सरकारचे व इतर अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे. पियुष यांचा संपूर्ण जीवन व उद्योजकीय प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात.
संवाद साधत आहेत उद्योगवर्धिनीचे संचालक आणि उद्योजक श्री. सुनील चांडक.
www.udyogwardhini.com
source